Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Vatratika => Topic started by: vishal maske on April 20, 2016, 09:10:32 AM

Title: तडका - योजनी फासा
Post by: vishal maske on April 20, 2016, 09:10:32 AM
योजनी फासा

योजना आली म्हणताच
लोक ऊतावळे होतात
स्वत:ला लाभ मिळवताना
संगती गोतावळे घेतात

योजना वेडे लोक पाहून
कुणी फायदा घेऊ लागले
लोकांची लुबाडणूक करण्या
योजनांचा फासा लाऊ लागले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३