काय सांगू बाबा तुम्हाला
तुमच्या ह्या देशाची स्थिती
सर्वसामान्यांचा देश ना हा
त्यांनाच बोलायची भीती!!
निवडणूकित आश्वासन देता
हातात सत्ता आली विसरतात
सामान्याने हक्क मागणी गेली
मग सत्तेची गुंडगिरी दाखवतात!!
इथली रक्षण करती व्यवस्था
उदास माफिया पोसत आहे
वशिलेबाजीत टेबलाखालुन
गुन्हेगारीचा नवामार्ग देत आहे!!
इथे अंधळ्या न्यायनिवाड्यात
निर्दोष गुन्हेगार ठरवला जातो
खिशात अगर पैसा असला मग
अट्टल गुन्हेगारही वाचवता जातो!
दहशदवादांचा धोका कायम
सीमेवरील घुसखोरी कायम
असे धोकादायक प्रश्न इथे अन
संसदेत निःतथ्य चर्चा कायम!!
ललित कुमार
********************