Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Gambhir Kavita => Topic started by: Lalit kumar on April 29, 2016, 02:51:05 PM

Title: ललित कुमारचे शब्द
Post by: Lalit kumar on April 29, 2016, 02:51:05 PM
मी ना कुठल्या जातीचा
मी ना कुठल्या धर्माचा
ज्या विचारात तर्क नाही
मी विरोधी त्या विचाराचा!!

मी ना कुठल्या पक्षाचा
मी ना कुठल्या सस्थेचा
ती विचारधारा मान्य नाही
मी मालक माझ्या बुध्दीचा!!

मी ना कुठल्या भाषेचा
मी ना कुठल्या राज्याचा
मातृ भूमी ही मातृ भाषा
मी आहे भारतदेशाचा!!

ललित कुमार
wapp-7744881103
------------------------------