हृदय माझे तुला देऊनी जात आहे
आठवणींची जोड ठेऊनी जात आहे
असणार सदैव मी तुझ्या अवतीभोवती
सावली बनून चालेल तुझ्या सोबती
साथ एवढाच होता आपला जिवनात
संपवले सारे नियतीने एका क्षणात
हरवून गेल्या पाऊलखुणा प्रेमाच्या
आड गेले मी दुर तुझ्या नजरेच्या
शोधून ही सापडणार नाही मी तुला
जवळ असूनही ना दिसणार मी तुला
भेट होईल स्वप़्नी, घेईल तुला कुशीत
आनंदी असेल मी नेहमी तुझ्याच खुशीत
आसमंती बनून तारा तुझ्या अंगणातला
वाट दाखवेल बनून काजवा अंधारातला
- गणेश म. तायडे,
खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com
(http://72.78.249.110/SM3/(S(rzj3xg2imolcbgbtxujzlu45))/DCFFB828070006F8770054CDDD7B036364D7FFFD86B65723EA3B8B363CB776774CA10B207E857D67.file)
मी गेली ! कधी हसायच्या कधी दु:खाच्या वाटेन, चालत मी गेली ! सुखदु:खाच होऊन वाटसरू, जीवन जगत मी गेली ! दिसेल ते सार काही, नयनी साठवत मी गेली! चांगल्या वाईटाची होऊनी सोबती, आसवांना पीत मी गेली! जन्माला आली तेव्हा, आईच्या कुशीत रडत मी आली ! कधी पाहीले ना वळुनी मागे, पुढे पुढे चालत मी गेली! - गोपाल वि. कावस्कार १२/०६/२०१६ , रविवार. (९६३७४८८४२०)