परमानंद म्हणजे काय असतॊ ?
खरचं तो असतॊ का नसतॊ
का उगाचं व्याख्यान देतो आपण त्यावरी
त्याचे झाले असे
परामानंदाचे गुपित कळले एका भक्ताला
रोज तो जाई साधूकडे
परमानंदाची महती ऐकायला
दासी पटक्या सेवेकरी असे तेथे राबायला
साधू बोले अन भक्त डोले
चाले रात्रन्दिवसा
दुखरी पीडा कधीपण गाठे
नाही त्याचा भरवसा
दिवसामागुनी काळ लोटला
परमानंद शोधूनं न सापडला
भक्त निघाला थकुनि घरासी
मनोमनी स्वतःला कोसी
जाता जाता चमत्कार जो घडला
पोटात जणूकाही अणुबॉम्ब तो फुटला
सैरावैरा पळे भक्त शोधावायासी आडोसा
पोटातील माल टाकावयला
पळता पळता झाड ते दिसले
झाडासामोरच माल टाकले
कसलं पाणी अन कसलं काय
शेजारील दगडाने ते पुसले
इतकेवेळा तुला ( परमानंदाला )शोधला
अन तू मला असा इथे भेटला
परमानंद हा वसे अंतरी
जाऊ नका कुणी साधू दारी
शोधा म्हणजे सापडेल ( परामानंदाचे झाड )
सिद्धेश्वर विलास पाटणकर C
hi
Chaaan...
धन्यवाद मित्रानो . मी आपला आभारी आहे.
सिद्धेश्वर विलास पाटणकर