सुनसान रस्ता, तापलेलंऊन,
पाय ओढीत निघालो ,माझेच
ओझे माझ्या खांद्यावर घेऊन,
जुनाट तुटलेल्या वहाना,
तापून कडक झालेले चर्म,
एकच तुटलेला पट्टा पाळतोय,
पायात अडकण्याचा धर्म,
झिजून पातळ झालेला तळ,
आणि त्याला पडलेले भोक,
तापलेली धरणी चटके देई,
मस्तकी निघते कळ,
कडेला एक झाड ,बाभळीचे केविलवाणे,
काट्याच्या आड जणू अदृश्य झाली पाने,
मरगळलेल्या जिवा बसावेसे वाटे,
न दिसे सावली , चहूकडे काटे,
पाहिले पानाविणा झाड जिर्ण झालेले,
जणु आत्म्या विणा कलेवर ऊरलेले,
थांबून आश्रयी विश्रांती ही जहाली,
सावलीची ईच्छा परि ऊन्हेच मिळाली,
फार झाली वणवण आता सोसवेना,
मलाच माझा आता, भार पेलवेणा,
मलाच माझा आता, भार पेलवेणा......??????????
अशोक मु. रोकडे.
मुंबई.