तू .....आणि पाऊस
धुवाधार पावसात तू वेडे
खुशाल भिजत राहीलीस
तो पाऊस मतलबी असा
तू पण शोषत राहीलीस
हजार ओठांनी चुंबता तो
तू अंग अंग शाहरत गेलीस
झालीस तू स्वतः हवाली
दोष त्याला देत राहीलीस
तुझे कळले मला इरादे सारे
पावसात ही पेटवून जाणे
माझ्या मिठ्ठीत असताना
पाऊस तू मनात संभाळणे
. . . परशुराम सोंडगे, पाटोदा
. . . 9673400928
wahh.. chan aahe prshuji
धन्यवाद
श्रीकांत जी
धन्यवाद
श्रीकांत जी
khup chhan kavita