त्याचं झालं असं
वॉटर कप स्पर्धेचं झालं हसं
गणपतरावांनी फॉर्म भरला
बायकोच्या नावे नोंद केली
तिचं नाव होतं गावावाणी
काय तर म्हणे, देवयानी
सरकारी नोंद झाली
स्पर्धेस सुरवात झाली
गावामागून गावे आली
गणपतरावांची फक्त फॅमिली आली
रिपोर्टर सर्व चाट पडले
नंतर सरकारवर तुटून पडले
गणपतराव स्पर्धेला आले
अन जाताना भरपूर सरकारी अधिकाऱ्याना
कायमचे घरी बसवून गेले
सिद्धेश्वर विलास पाटणकर C