Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: Deepak Chavan on August 31, 2016, 11:36:03 PM

Title: एक प्याक ......!
Post by: Deepak Chavan on August 31, 2016, 11:36:03 PM

बियर पिता पिता गड्या दारु प्यायले शिकलो
काय सांगु या दारूपायी आयुष्याची वाटच चुकलो

नाक्यावरचा सखा म्हणे ,गड्या बियर असते शाकाहारी
बियरसोबत दारू पिता पिता माझं मन झालं मले लय भारी

दारूच्या चटक्यापायी गड्या मले एकट एकटं रहावं वाटलं
माझी मुलं बायको सारं काही आज मले बाटलं...!

करमत नाही गड्या मले, नाही मनात कोणती पारु
आपल्या मनात एकच फक्त ती आपली दारू

मुलगी बोलली तर जेवढा राग येत नाही,तेवढा राग गड्या तुझ्यावर आला
आज नाही मित्रा ऊद्या दारू पिऊ असं जव्हा तू म्हणाला

आज काय भाजी खाल्ली हे गड्या मले ही आठवत नाही
रम, ओडका शिवाय माझ्या मनात काही साठवत नाही

पोरगं माझं म्हणते मले गड्या, पप्पा अजून सुधरा बरं
दारूपायी लिव्हर खराब झालं तर काही नाही खरं

पोराचं सांगण गड्या हे माझ्या मनाले ही पटते
पण गरिबीच्या टेन्शनपायी गड्या दारूच मले जवळची वाटते

दारु सोडतो गड्या, फक्त सरकारले एकच आहे माझं सांगण
बिहारसारखं महाराष्ट्र ही दारू मुक्त करा हेच माझं शेवटचं मांगण...!



दिपक चव्हाण,
मु.पो.मुंदेफल ता.मेहकर, जि. बुलढाणा
Contact us :- 8108914410
Email:- chavan.deepak297@gmail.com