व्यथा
सुगंध घेता फुलाचा
काटा कधी रुतावा
सौख्यातही सुखाच्या
विष डंख उरी सलावा
दुर्भाग्य असे जीवनी
कुणा कधी नसावे.
डोळ्यात असुनी पाणी
ओठी कसे हसावे.
पिसाट सुटला वारा
राहिला दूर किनारा
मागू कुणा कुणा मी
दुबळ्या मना सहारा
वदली न कुणा व्यथा
हसलो सदा निर्व्यथा
थकलो थकलो आता
झुकवितो इथेची माथा.
- अरुण सु. पाटील
https://www.facebook.com/AsuChyaKavita