आज तुझ लग्न ठरलय आणि आता तू खुप खुश राहशील,
पण जाता जाता बोललिस माझ्यावर कविता करशील..
तस तर तुझ्यावर खुप दिवसांपासून लिहायच् म्हणतो,
पण तुझ्यासाठी शब्दच् सापडत नाहीत..
तुझा विषय निघाला की शब्द हरवतात,
कारण तेंव्हा मि मी नसतो....
आसमंतात तुला शोधत भरकटत असतो,पण नेहमी प्रमाणे निराशा होते..
हातातली सिगरेट पुन्हा भानावर आनते, तू नसुनहि कायम बरोबर असतेस...
तुझ्याशि मी रोज बोललोहि असतो,
थठ्ठा मस्करी भांडण ही होते...
तरिही तू कोण आहेस ?
कशी आहेस ?
कुठे आहेस ?
एक ना अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत..
पण एक दिवस तू समोर येणार आणि,
तेंव्हा मात्र शब्दांचा पाऊस मुसळधार बरसनार....
Vaibhav.......