काळोख दाटलेला मनी
घेऊनी जा मजला उजेडात
शोधतो मी स्वतःला काळोखात
माणूसकी हरवलेल्या माणसात
काळ्या दगडासही पाझर फुटे
मानवी हृदय कोरडे पाषाण
दयाघना परमेश्वरा बुद्धी दे आम्हांस
होण्याआधी सृष्टी तुझी रे स्मशान
जन्म घे एकदा पुन्हा उघडण्या
झाकलेली पापणे उजेडात
जन्म घे एकदा पुन्हा शोधण्या
हरवलेली माणसे काळोखात
दाटलेला अंधार मनीचा काढण्या
उजळू दे किरण एक प्रकाशाची
न्हाऊनी जावे काळोखाने उजेडात
आस आहे अश्या लखलखत्या सुर्याची
- गणेश म. तायडे, खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com
(http://72.78.249.110/SM3/(S(4abkyrymvvvhcsaldqibpufb))/DCFFB828070006F8770054CDDD7B036391F3652A9B444A36FABB9D45C0ABD0C22A7C13B2258DAA36.file)