................सोडून गेलीस तर..............
नको जाऊस गं माझ्या पासुन दूर,
तू गेल्यावर बंद होतील माझे सुर.!
आठवण फक्त मला तुझीचं येईलं,
आठवणीत अश्रुंचे पुर वाहतिल.!
लग्नाच्या साडीत छान गं दिसते,
तूला पाहून एक जखम गं होते.!
आज भरून घे पोरी ह्रदयात मला,
उद्या सोडणार आहे साऱ्या जगाला.!
नको माझ्यावर येवढं प्रेम करू,
मी गेल्यावर तुला येईलं रडू.!
मोती माझ्यासाठी नको गं वाहू,
डोळे मिटल्यावर मला नको पाहू.!
सखे सुखानी संसार कर,
सासरी आनंदात तू वावर.!
शप्पथ आहे तूला आपल्या प्रेमाची,
विसरून जा मला विनंती शेवटची.!
-----------बालाजी लखने (गुरू)-----------
उदगीर जिल्हा लातुर
भ्र ८८८८५२७३०४