नाते एवढेसे तुझे नी माझे हे
धागे प्रेमाचे तुझे नी माझे हे
का दूर व्हावे आपले किनारे २
का नाते रुठावे धागे तुटावे हे
नाते एवढेसे तुझे नी ...........
तूच तू होती स्पंदनात माझ्या
राहल्या ना या एकट्याच वाटा
प्रेम संपले कशाने आपले हे २
वाहून आल्या प्रलयाच्या लाटा
नाते एवढेसे तुझे नी ...........
वाटले ना कधी दूर जाशील तू
अर्ध्यात सोडूनी रडवशील तू
तुझ्या मनाची खबर तुला गं २
सांग ना सखे का दूर गेली तू
नाते एवढेसे तुझे नी ...........
मीच आता जगतो जगण्याचे
आठवणीत या रोज मरण्याचे
जा रहा तू सुखी जीवनी त्या २
रडतो गं रड़ने माझ्या रडण्याचे
नाते एवढेसे तुझे नी ...........
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्र.९९७५९९५४५०