Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: maddy pathan on September 16, 2016, 09:29:01 AM

Title: उरला आहे तो फ़क्त
Post by: maddy pathan on September 16, 2016, 09:29:01 AM
*उरला आहे तो फ़क्त*

प्रेयसी असेपर्यंत सारं ठीक होत,
बायको झाल्यापासून भांडणे खुप वाढली आहेत,

संसाराच्या वृक्षावरील हिरवी पाने पार झाडली आहेत,
उरला आहे तो फ़क्त पालापाचोळा,

प्रेयसी असतांना "तू म्हणशील तसंच होणार" असं सारं नेहमी म्हणायची,

आता मात्र माझ्यावरंच वेळ आली आहे रडायची,
उरलं आहे ते फ़क्त अश्रुत बुडायचं,

प्रेयसी असतांना वेळ देत नाही म्हणायची बायको म्हणुन सोबत असतांना काय दिवे लावतेय,

"आमचं किती प्रेम आहे" असं सा-या जगाला उगीचं दाखवतेय,
उरला आहे तो फ़क्त बिनपैश्याचा तमाशा,
प्रेयसी असतांना माझ्याकरीता तुला खुप गोष्टी कराव्याश्या वाटायच्या,

बायको झाल्यानंतर मात्र कणिक तू मळायचीस अन पोळ्या मी लाटायाच्या,

उरलं आहे ते फ़क्त पूर्ण वेळ स्वयंपाकी व्हायच,
प्रेयसी असतांना तुला सोडुच नये असं वाटायचं बायको झाल्यानंतर कधी एकदाचं सोडतो असं झालंय,

कामे दोघांनी करायची असतात पण तू माझं ओझ्याचं गाढव केलंय,
उरलं आहे ते फ़क्त ओझं वाहता-वाहता जीव सोडायच.

मॅडी.9975086836