Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: विक्रांत on September 24, 2016, 08:58:30 PM

Title: कवित्व
Post by: विक्रांत on September 24, 2016, 08:58:30 PM


शब्द सुखाचे खुळे उमाळे
जगलो धुंद गात्री भिनले
स्वप्न पाहिले बहरून आले
कधी पेटले धडधड ज्वाले ।
शब्द अंतरी सखे जाहले
जाग मिटेस्तो साथ राहिले ।
शब्द कोवळे नाजूक ओले
जीव जडले  कधी भेटले ।
शब्द ताठर अवघडलेले
कधी सांडले नको असले।
तरीही त्यांनी काही दिधले
कणखरपण जीवन ल्याले  |
किती तयांचा ऋणी असे मी
तया वाचून काही नसे मी ।

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
Kavitesathikavita.blogspot.in