आत्ताच धरली होती खपली
बाजारात बघता तुला
पुन्हा नव्याने जखम झाली
गेली खपली गेली , त्या जागी परत जखम आली
सामानाची पिशवी आठवणींनी जड झाली II
कांदे बटाटे नकोसे झाले
भाज्यांचे रंग आवडेनासे झाले
दाखवून त्या हिरव्या रंगांसी पाठ
लाल निशाण फडकावले II
फेकून दिली पिशवी
भर रस्त्यावर बाजारात
अस्साच परतलो माघारी
हात हलवून घरात II
सिद्धेश्वर विलास पाटणकर C