Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Vatratika => Topic started by: शिवाजी सांगळे on October 07, 2016, 02:26:13 PM

Title: पणपण काहीही म्हणा... रोप वे ची शक्कल
Post by: शिवाजी सांगळे on October 07, 2016, 02:26:13 PM
पणपण काहीही म्हणा...

रोप वे ची शक्कल

मेट्रो झाली नंतर मोनो झाली
एसी लोकलचीही चाचणी झाली,
गर्दी कमी करण्या साठी आता
रोप वे ची शक्कल कशी लढवली?

खरा प्रश्न गर्दीचा वेगळाच आहे
एकाच दिशेला सार्‍यांचा फ्लो आहे,
कार्यालयांचे विकेंद्रींकरण व्हावे
यावर हाच एकमेव तोडगा आहे !

© शिवाजी सांगळे 🎭