मला तुझ्यासारखं किराणा
मालाच्या दुकानातून साखर ,मीठ,मसाला
आणता येतो,
तुझ्या सारखं
बाजरातुन कांदा, मिरची,भाजी
आणता येत,
अगदी दळणंही दळून आणतो,
कपडेही पिळून काढतो,
पोरांच्या शाळेचा वेळा चुकवत ही नाही,
कढईच्या कोरा चकाकुन काढतो,
घुसमटलेल्या घरातल्या जाळ्या ही
काढुन टाकतो,
तु केलेला पसारा ही आवरतो,
पण हे तुझ्या विना खरतर काहीच शक्य होत नाही,
गुदमरून जातो घरात,कपाळावरच्या घामाच्या धारांनी न्हाऊन घेतो स्वतःला,
खिडकीतुन दिसतं घराबाहेरच मोकळं वातावरण ,जणु बोलवतय मला ,करून देतंय मोकळीक स्वतःसाठी, आणि जाणीव होते तुझ्या घुसमटलेल्या मनाची, आठवतात शब्द मी करू शकतो हे सर्व,आणि तु ते करतेस रोज स्वतःला आणि कुटुंबाला सावरून.