भाव तुझीया मनिचे !!!
----------------
भाव तुझीया मनिचे जरा ऊमजून सांग
प्रितीचे तुझे तराणे जरा खुलऊन सांग
**१**
डोळ्यात पाहिले मी तुझिया भावनांना
शब्दाविना हे भवबंध जरा ऊलगडून सांग
**२**
ऋतु हिरवा बघ कसा बहरून आला
नाते अपुले नव प्रितीचे जरा लाजून सांग
**३**
अजून स्वप्ने कोमलांगी किती रंगवावी ?
दे झुगारून बंध रूढीचे जरा सत्यात येऊन सांग
**४**
गंधाळला बटमोगरा काया सुगंधित तुझी
रंगऊन नजारे भावनांचे जरा रंगात रंगऊन सांग
**५**
बघ हासरी कालची प्रित लाजरी बावरी
शब्दात बांधताना "गझल" जरा हरऊन सांग
**६**
प्रकाश साळवी