शाळा नसे फक्त शिकण्यासाठी अभ्यास
शाळा असे आम्हा सवंगड्यांचे निवास
नको ते बाबा , नको ती आई
आम्हास नित्य शाळेत जाण्याची घाई
आम्ही जातो, धावतो शाळेत लवकर
दोन गोष्टी गमतीच्या पुरे, शाळेअगोदर
शाळेत चालू तासांवरी तास
आम्हास केवळ तो खाऊच्या सुट्टीचा ध्यास
कुणी काय आणिले ते डब्यात पाहू
एकमेकांचा सुखाने डबा आधी खाऊ
हात धुवू कधी,तर कधी पुसू एकमेकांस
गर्दीत काय समजतेय ?
पुसलय कोणाच्या शर्टास
मधली सुट्टी आम्हा सर्वांचा
असे जीव कि प्राण
त्यात बनवितो, उडवितो
आम्ही स्वप्नांचे विमान
घंटा वाजता दुसरी ,
होतो सुट्टीचा अंत
गुरुजी खडू घेऊनि येतील इतक्यात
हीच मजा करताना खंत
आगमन त्यांचे सुट्टीनंतर
लावी नित्य घोर
कधी एकदा वाजतेय शेवटची घंटा
अन आम्ही पडतोय शाळेबाहेर
सिद्धेश्वर विलास पाटणकर C