Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Gambhir Kavita => Topic started by: Ashok_rokade24 on October 23, 2016, 01:11:36 PM

Title: आसवें ही माझी...?
Post by: Ashok_rokade24 on October 23, 2016, 01:11:36 PM
आसवें ही माझी, नयनी तुझ्या का,
जखमी मन माझे, वेदना तुला का,

सुखाचा क्षण माझा, ओठी तुझ्या हसू का,
नाही ऊमजले अजूनही,घडते असे का,

दृष्टी आड होता, नजर भिरभिरते का,
दृष्टीस जेंव्हा येता, समाधान वाटे का,

नजरेस नजर मिळता,पदर सावरते का,
होई भेट जेंव्हा, शब्द मुक होती का,

माझी ही गत ऐसी, जी तुझी असे ,
असून ही सर्व भोवती, मी कुणातही नसे,

इथे तिथे सारी कडे, तुलाच पहातो,
नसे विश्वास तरीही,साकडे तुजसाठी घालतो,

प्रयत्न केले किती  तूला सांगण्या साठी ,
अजुनही  न आले शब्द माझ्या ओठी,

नाही ऊमजले अजूनही, आयुष्य आता सरले
स्वप्न माझ्या मनीचे, मना मध्येच विरले,

संपले सर्व काही, खेळ ही संपला,
न ऊरला अर्थ आता,माझ्या अस्तित्वाला,

घेईन जन्म पुन्हा, तुला भेटण्या साठी,
गुज माझ्या मनीचे, तूला सांगण्या साठी.!!!!!!!!!!
गुज माझ्या मनीचे ,तूला सांगण्या साठी ?????

                                      अशोक मु. रोकडे.
                                      मुंबई.