-----------------भेट-------------------
स्वप्नात तिची माझी,
रोजच भेट व्हायची.!
ती येताच मला पाहून,
गालातच गोड लाजायची.!
आमची भेट होताच,
मंद गार वारा सुटायचा.!
स्पर्श करून जाताच,
मनात प्रेमाचा रंग भरायचा.!
भरून एकमेंकाच्या मनात,
आम्ही इंद्रधनुष्याचे रंग.!
प्रेमाचे गाणे कविता ,
म्हणायचो तिच्या मी संग.!
तिच्या माझ्या भेटीचा,
योग रोज रोज घडायचा.!
रोजच स्वप्नात प्रितीचा,
रिमझिम पाऊस पडायचा.!
ती ही हसत लाजत मला,
ओठातल्या ओठात बोलायची.!
तू पण येणा माझ्या स्वप्नात,
भेटायला मला म्हणायची.!
नदी सारखे वाहत होतो,
संथ गतीने प्रेमात आम्ही.!
स्वप्नातल्या प्रेमाच्या दूनियेत,
रोज रोज भेटायचो आम्ही.!
आतूर होते माझे मन,
तिच्या चेहरा पाहायला.!
ओठावरचे तीळ पाहाताच ,
लागतो मी हरपायला.!
कॉलेज मधल्या पहिल्या भेटीची,
काय जादू झाली माहिती नाही.!
जिवन आता तिला समजलय,
तिच्या शिवाय जिवनच नाही.!
----------बालाजी लखने(गुरू)----------
उदगीर जिल्हा लातुर
भ्र.८८८८५२७३०४
वाह ......खूपच छान रचना बालाजी सर ....
एक नंबर कविता सर.!!!खूप छान...