अंधळे तुफान
कोणी तिला बुरख्यात बांधून ठेवले,,
कोणी तिला खोप्यात डांबून ठेवले,!
संस्कृतीच्या आड लपून ,_______,
कोण तिला शब्दात मोकळे करतो,,
कोण तिला कायमचे पागळे करतो,!
संस्कृतीच्या आड लपून ,_______,
कोण तिची शुध्दतेची परिक्षा करतो,,
कोण तिच्या बुध्दीची समिक्षा करतो,!
संस्कृतीच्या आड लपून ,_______,
कोण तिला भोग वस्तू म्हणून पाहते,,
कोण तिला दिवसरात्र राबवत राहते,!
संस्कृतीच्या आड लपून ,_______,
कोण हा कोणवर वार ती करेल का?,
अंधळ्या तुफाना गार ती करेल का?,,
काळजात आग लागून ,_______,
✍🏻 ललित कुमार _____________
18/11/2016 (1:57am)
wapp7744881103