Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Vatratika => Topic started by: शिवाजी सांगळे on November 22, 2016, 11:21:49 AM

Title: पण काहीही म्हणा... यशस्वी
Post by: शिवाजी सांगळे on November 22, 2016, 11:21:49 AM
पण काहीही म्हणा...

यशस्वी

नोटाबंदिला जे आर्थिक
आणिबाणी घेतात संबोधुन,
लावुन मांडीला मांडी त्यां
घेतात कसे शेजारी बसवुन?

बोलतात एकिकडे एक
दुसरी कडे दुसरे बोलायचे
असेच असतात का हो
डाव यशस्वी राजकारणाचे?

© शिवाजी सांगळे 🎭