आता तू तर नाही
तुझ्या आठवणी उरल्या आहेत
तुला जिंकू शकलो नाही
आणि धारा अश्रूंच्या सरल्या आहेत
खरं तर तू जाताना
ह्या आठवणी न्यायच्या असत्या
त्यामुळे जीवनाच्या माझ्या
वाटा मोकळ्या झाल्या असत्या
आज वेदना फक्त
तुझ्या आठवणींच्या होतात
इन्कार केलेले शब्द तुझे
रोज मला धीर देतात
sagar dubhalkar
9604084846