स्वप्नांना मनातल्या माझ्या,
मनात तुझ्या जागा देतेस.
स्वप्नांच्या दुनियेतली तु,
राजकुमारी माझी होतेस...
चंद्राची शितल चांदणी तू,
धरतीवरून तुला पाहतो.
सागराची अथांग खोली तू,
बुडून तुझ्यात मी जानतो...
स्वप्नांच्या दुनियेत माझे,
हरवून वेडे मन जाते.
तु असतेस तिथे म्हणून,
स्वप्नांत करमून जाते...
लेखक - प्रविण सिनारे
छान प्रयत्न आहे सर....अजुन छान लिहू शकता तुम्ही...आणि शेवटी कवी असे लिहा....
sundar kavita aahe .manatil bhavna sudar tarehene rachali aahe .
Thanks
छान..... :)