तार अजूनही कुठे
जुळलेली होती
नुसत्या ठिणगीने मने
पेटलेली होती
समोर होती तु माझ्या
पण दुर तु होती
हातात हात होता पण
अनोळखी तु होती
काय होते तुझ्या मनात
मज जाणीव होती
पुन्हा तुला शोधण्या माझी
धडपड सुरू होती
श्वास माझा होता अखेरचा
मनात धडकी होती
दिसत असलो मी जरी शांत
पण मनात वादळे होती
कुठल्या तरी गिधाडाची
माझ्या प्रेमावर नजर होती
ठाण मांडून केला हमला
ती एक काळरात्र होती
आघात केला होता मनावर
जखम खोलवर होती
वेदनेने पेटलेल्या मनात
दुखे असहणीय होती
विश्वास होत नव्हता मज
तु सोडूनी जात होती
वर्षानुवर्षाच नात आपल
क्षणात तुटत होती
खरंच तार आपल्या प्रेमाची
एवढी कमजोर होती?
एका गिधाडाच्या घातात
जशी तुटत होती
विश्वास होता मनात माझ्या
तु अजूनही माझीच होती
डोळ्यात अजूनही तुझ्या
माझीच प्रतिमा होती
मिठीत फक्त एकदा तुला
घेण्याची गरज होती
फक्त एकदा तुला पुन्हा
बच्चा म्हणण्याची गरज होती
- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11
(http://72.78.249.110/SM3/(S(3ljn5w45bz4qrkbnjkii5m45))/DCFFB828070006F8770054CDDD7B0363BF62DCCFD46AA2AC80CBD2F450C7055697CB32F4E8DEF506.file)