कविते बघं ना आज तुला मी
माझ्या शाईमध्ये न्हावून काढलं
थेंब थेंब बरसला तुझ्या शब्दांवर
आज तुला मी चिंब भिजून टाकलं
भावना अजूनही माझ्या तेवढ्याच
उत्कट तिव्र आहेत तुझ्यासाठी
लिहताना आजही मला तु पाहते
गप्प उमटते कागदावर माझ्यासाठी
का कसे कळते तुला मनातले माझ्या
भाव शब्दांतून मांडते अश्रु डोळा येती
का कसे जमते तुला सांभाळणे मला
बांधते आपल्यात नाजुक अलगद नाती
एकांतातली साथ प्रेमाची तु बात
तु माझी कविता मी तुझा कवी आहे
नको भिजू आसवात रहा तु मनात
तुझ्या सहवासाची ओढ लागली आहे
- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11
(http://72.78.249.110/SM3/(S(4dzloyrikf3x3545nkwgd1rj))/DCFFB828070006F8770054CDDD7B0363F3A4533A8D188E38AE015B07AFE4D93103CAED914A1844FA.file)