Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: siddheshwar vilas patankar on December 12, 2016, 02:44:54 PM

Title: कविता II माझी फक्त एक "समाधी" आहे .... II
Post by: siddheshwar vilas patankar on December 12, 2016, 02:44:54 PM

अंत्ययात्रेआधीच माझ्या मनाचे दहन होतं  आहे

अगं आता सहन होतं नाही आहे

आधी मित्रांचा पाडाव

बरोबर केलेला तू प्रेमाचा शिडकाव

"फक्त तू आणि मी " हि दिलेली शप्पथ

पाळण्यासाठी खेळावा लागणारा लपंडाव

हे सारं ठीक होतं लग्नाआधी

कशी विसरू मी

तू बांधलेली लग्नानंतर माझ्या मनाची समाधी

आत्ता जेव्हापण वर तल्लीन होऊन बघतो

मी माझ्या मनात हरवतो

फार काळ लोटत नाही त्या तंद्रीत

कर्मचारी त्याच्या निर्गमनाची वर्दी देतो

तेव्हा कुठे भानावर येतो

हो मी नेहेमी हरवतो माझ्या कामावर

मी असतो माझ्या मनात

जिथे सर्व माझ्या सोबत असतात

गुजगोष्टी करतात

मला ओढत असतात

परत परत त्याच वाटेवर

जी जुनी असूनही नवीन असते माझ्यासाठी

कारण मी आत्ता  मीच उरलो नाही

माझ्या मित्रानो

हि जी दिसतेय ती आता फक्त

माझी समाधी आहे

माझी फक्त एक "समाधी" आहे ....



सिद्धेश्वर विलास पाटणकर C
Title: Re: कविता II माझी फक्त एक "समाधी" आहे .... II
Post by: uttam pawar on December 12, 2016, 06:39:41 PM
तुज पुन्हा स्मरताना आज

वाहिल्या नयनी धारा

आठवणी तुझ्या आल्या घेऊनि

प्रेमरंगाच्या बरसती  धारा


कवी :: नार्वेकर संतोष

चारोळी संग्रह "चार क्षण"

सुंदर रित्या शब्दबद्ध केली आहे समाधी . जवळ जवळ लग्नानंतर  प्रत्येकाला  हे सहन करावं लागतंच . सुंदर कविता झाली आहे .

उत्तम दशरथ पवार
मुंबई
Title: Re: कविता II माझी फक्त एक "समाधी" आहे .... II
Post by: siddheshwar vilas patankar on December 16, 2016, 04:35:09 PM
Thank you very much Mitra.