नजरेस पडली आज एक सुंदरी
आठवले तुझे रूप हरहुन्नरी
जणू हुबेहुब तुझीच प्रतिकृति
अगदी तुझ्यासारखीच शांतवृत्ति
स्वर्गातून जणू अवतरली अप्सरा
गालावर खळी चेहरा सदा हसरा
नयनी भासे नक्षत्राहुंनिया न्यारा
नजर ना हटते जणू देते पहारा
प्रिये तुझसम भासली जरी
तुलना ना होते गुणांची तरी
दांटून येतो कंठ हे दुःख्ख उरी
तूच होती माझी खरी स्वप्नपरी
शब्द : सावनकुमार