Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: अमोलभाऊ शिंदे पाटील on December 19, 2016, 06:41:59 AM

Title: माझं प्रेम होत फक्त तुझ्या साठी
Post by: अमोलभाऊ शिंदे पाटील on December 19, 2016, 06:41:59 AM
माझं प्रेम होत फक्त तुझ्या साठी
तुझं प्रेम कुठं होत माझ्या साठी
मी नेहमी रडत होतो फक्त तुझ्या साठी
तू कुठं रडलीस माझ्या साठी
मी फक्त तुला पाहिलं माझ्या साठी
तू कुठं होतीस माझ्या साठी
मी पत्र लिहलेत नेहमी तुझ्या साठी
तू कुठं लिहलंस पत्र माझ्या साठी
मी आज ही आहे तुझ्या साठी
तू कुठं आहेस आज ही माझ्या साठी
तू सोडलस मला दुसऱ्या साठी
मी कुठं सोडलं तुला दुसऱ्या साठी
मी आज ही पावसात भिजत आहे तुझ्या साठी
तू कुठं आलीस माझ्या सोबत भिजन्या साठी
मी घर सोडले तुझ्या साठी
तू साधा उंबरा सुद्धा सोडला नाहीस माझ्या साठी
मी आठवणी ठेवल्यात जपून तुझ्या साठी
तुला आठवण सुद्धा नाही माझ्या साठी
मी नाते तोडलेत तुझ्या साठी
तू नवे नाते जोडलेत फक्त तुझ्या साठी
एक गोष्ट आहे ती फक्त आहे माझ्या साठी
मी आज ही जिवंत पणी मरत आहे फक्त तुझ्या साठी.....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर
Title: Re: माझं प्रेम होत फक्त तुझ्या साठी
Post by: विजय वाठोरे सरसमकर on December 22, 2016, 04:43:40 PM


वा अमोल सर
छानच कविता ....
आवडली .........