रम्य पाऊस
शांत सरींतुन झरे
गगनातुन सांड़ले
घन मोतियाचे सड़े.....
दाट नभातुन साऱ्या
मेघ मल्हार आळवे
मेघ कल्लोळ घालति
थेंब पानांवर पळे....
रंगात बुडुनि पर्ण
झाली गोजिरे बावरे
पर्वतानि थोपविलि
सारी घोंगवी वादळे....
निर्झर पाऊस
पाउलवाटां ना भीजवे
पालवी कोंबातुन
देह वृक्षाचा जागवे.....
पाण्याला कंप येतो
लाटा भेदर आवरे
आकांतुन जाते माति
थेंब थेंबाला सावरे...
-रोनित गायकवाड़
Mob 9922922308
Wah. Nice one.