वादळ
वादळ आलया उराशी
घेतलया कड्याशी
सोडूनीया अंबरा
संबंध पेटलया मनाशी
कुणा कुणास सावरु
नात कस हे आवरु
कोड्यात पडलया सार
नशा झाली हो लाजरु
दिव्य स्वप्न अंधारलय
माझ्याच अंगणात
माझीच हवा न्यारी
केव्हा होणार पहाट
उत्तर पडलीयात हजार
प्रश्न हवेतून यावे अन
भाव माझ्या मनीचे
वचन कोणी पचवावे
सैराट झालया संबध
मन रडतंय दारात
याड लागलंय जीवाला
प्रेम जडलया मनात
@ मनिष सासे
At- shahapur ( kinhavali )
9209250092