|| संघर्ष एकट्याचा ||
अपेक्षा मज नाही कुणाच्या मदतीची
कुणाच्या करूणा आणि दयेची
एकटा जगतोय जिंदगी स्वबळावर
नाही गरज मला कुना मायेची
संघर्ष हा माझा आहे
मज कुणाची साथ नको
लढतो स्वबळावर एकटाच
कुणाच्या मदतीचा हाथ नको
सुख दुःख जे पदरी येति
माझ्या सामर्थ्याचा अनुभव देती
दुःखाचा उन्हाळा सोसतोय काय गरज असे छायेची ||१||
मिञ व नातलग, जवळीक दाखविती सर्वजण
एन वाईट वेळेला कामी न येति एकपण
वाईट वेळ सांगते, कोण आहे ते परके
सुखात सारे असतात, गोड साखरे सारखे
समजतोय मी आता खोटी शक्कल मायेची ||२||
- गणेश बुंदे (९५९५९४१२६९), नागपूर.[/size][/size]