Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Bhakti Kavita => Topic started by: शिवाजी सांगळे on February 03, 2017, 11:51:28 AM

Title: आग्रह
Post by: शिवाजी सांगळे on February 03, 2017, 11:51:28 AM
आग्रह

देवाजीस येथे लागला घोर देवळाचा
पडेल कधी हातोडा अतिक्रमणाचा

शोधतोय तो आसरा चरणी भक्तांच्या
वाढला बोलबाला पहा भोंदु बाबांचा

अपेक्षा नाही त्या उंची सुवर्ण दानाची
हवाय तो जोडलेला हात नमस्काराचा

शोध तुझ्यातच मला, दडलोय मी तेथे
आग्रह प्रेमळ पोहचविला हा देवाजीचा

© शिवाजी सांगळे 🎭