बांध..
सर्वांची नजर चुकवून तुझ माझ्याकडे बघण माहित असत मला
पण तुझ्या नकळत माझ तुला बघण हे कळलच नाही तुला,
मनाच्या वहीत जपलय तुझ्या प्रेमाच एक पान
अजानत प्रेम माझ डोळ्यातून तू जाण.
कधी कधी वाटत सर्व सिमरेषा तोडून याव तुझ्या मिठीत जरा
आणि चालत तुझ्या पावलासोबत स्वर्गमुख पाहाव जरा,
राज्या जेव्हा हातात हात घेशील माझा तेव्हा भीती मला कशाचीही नसेल
अंधारातला काजवाही तेव्हा सुर्यापेक्षा प्रखर दिसेल.
सगळ्यानाच जमत नाही माझ्यासारख वागणं
ओठावर नसल तरी मनात मात्र तूझच असणं,
गाण्यातील प्रत्येक शब्दाला असते तुझ्या आठवणीची साद
डोळ्यातील प्रत्येक अश्रुला माझ्या पापणीचा बांध...
विशाखा सोनावणे..
सहज सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे,
हे असे माझे तुझे अन त्या ढगांवर चालणे.
शोधते स्वतःला भेटुनी तुला,
पण रस्ते नवे नेती कुठे नाही कळे मला.
तू जिथे, मी तिथे.....#paglu