ओथांबून आलेल्या घनाना
सांग परतायला
भरलेली माझी घागर
सांग उचलायला
राग माझ्या मनातला
सांग जरा छेदायला
मंद झुळूक होऊन
सांग जरा निजायला
गुरफटलेल्या भावनांना
सांग जरा उडायला
माझ्या जखमेची खपली
सांग जरा काढायला
उतरून अंतरी
सांग जरा मिसळायला
झेलून घाव आभाळाची
सांग जरा उंडायला
।।।।।।।।।।।।।।।।।राहुल सरोदे