Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Gambhir Kavita => Topic started by: Kumar Sanjay on February 19, 2017, 01:37:05 PM

Title: मज सोडुनी जाताना ...
Post by: Kumar Sanjay on February 19, 2017, 01:37:05 PM
सोडले मजला तेव्हा
भुलवाया दिले पैजन
व्याकुळ संध्येने केले
बुंबुळाचे ओले अंगण

प्रीत सांडल्यावरती
स्मुतीचे उरले धागे
कुष्णाच्या वेणुवरती
मीरेची विरानी मागे


मरणाच्या आधी लिहतो
चिंरतन पार कुणी
गे सखी माझी भोळी
देहाची नश्वर गाणी


- कुमार संजय

7709826774