उध्वस्त
मनाचा आजार
समजेना कुणा
वणवण फिरूनि
भीक मिळेना
जगावे कसे ?
मन झाले सुरुंग
स्वतःच्याच भोवती
स्वतःचे तुरूंग
अंधाऱ्या घरात
भुतांचा वास
रहावे कसे
भितीचा फास
मी कुठे, कसा ?
कोरडा घसा
पाण्याविना मासा
तडफडतो जसा
देई ना कुणी
मदतीचा हात
जीवन मागतो
मी भीत भीत
- अरूण सु.पाटील
https://www.facebook.com/AsuChyaKavita