Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: श्री. प्रकाश साळवी on February 21, 2017, 02:45:45 PM

Title: शल्य !!!
Post by: श्री. प्रकाश साळवी on February 21, 2017, 02:45:45 PM
शल्य !!
---------
मज आसवांनी अजून का झुरावे
तुझ्या आठवांना अजून का स्मरावे
**
एक एक शब्द माझा जणु काळजाचा निखारा
तुला आठविता मी अजून का जळावे ?
**
देतेस का तु माझ्या स्मृतिंना उजाळा ?
वीरहानी माझ्या का थेंब होवोनि गळावे ?
**
वचनांनी तुझ्या का हुंकार द्यावे ?
माझ्याच वेदनांना मी अपसुक का गिळावे ?
**
माझेच दुःख आता मजला साहवेना
वास्तवास बघुनी मी दूर का पाळावे?
**
प्रकाश साळवी
२१/०२/२०१७