ह्रदय भरून येत माझं
तुझी आठवण आल्यावर
हळुहळू शब्द फुटायला
लागतात ह्रदयाला माझ्या
तुझी आठवण आल्यावर...
कंठा पर्यंत ऊर
भरून येतो माझ्या
तुझी आठवण आल्यावर...
श्वास पण घेन
कठीण होत मला
तुझी आठवण आल्यावर...
डोळ्यातून अश्रू वाहू
लागतात माझ्या
तुझी आठवण आल्यावर...
डोळ्या समोर
चेहरा दिसू
लागतो मला तुझा
तुझी आठवण आल्यावर...
खूप तुझी
आठवण येती मला
तुझी आठवण आल्यावर...
ह्रदय माझं
अगदी व्याकूळ
होऊन जातं
तुझी आठवण आल्यावर...
नको वाटतं
मला हे आयुष्यचं
जगायला आता
तुझी आठवण आल्यावर...
सोडून जाईन गं
मी एक दिवसं
हे जगचं सगळं
तुझी आठवण आल्यावर...
लिहून ठेवावसं
वाटतं मला
दुःख माझं शब्दातं
तुझी आठवण आल्यावर...
♡ राहुल घोरपडे ♡