घुमली ही शीळ नभात
गुणगुणली सुरेल ओळ मनात
परतली पाखरं घरट्यात
उतरली संध्या सागरात
पाहिली तांबड्या सूर्यात
तेजाची ज्वलंत मशाल
घेतली झेप आकाशात
केली चंद्रभू पादाक्रांत
नटली सहा ऋतूंत
धरा पृथेची नवग्रहांत
ऊन सावलीच्या खेळात
रंगला सारीपाट दिनरात
घेतली मौज जीवनात
शोधली दिशा प्रश्नांत
पामरा, अजब या दुनियेत
का अडकली बेडी समयचक्रात?
Happy Science Day!!
-- Pallavi Kumbhar