स्त्री आदर
झालाय सर्वत्र काळोख आता,
भयभित सारे जिवन हे.
आयुष्याची देणगी स्त्रीची,
बळकावू पाहतायेत नराधम सारे.
लढा अस्मितेसाठी त्यांचा,
फार काळ आहे जुना.
नको देऊ त्रास तिला,
घेईल मदमर्दिनीचा अवतार पुन्हा.
प्रकाशाच्या वाटा त्यांनी ,
सावित्रीमाईच्या कुशीत पाहिल्या.
जिजाऊंकडून जिद्द आणि,
कष्ट आईकडून शिकल्या.
ठेऊन भान महापुरूषांचे,
आदर स्त्रीचा कर जरा.
पुन्हा ताठ मानेने जगण्यासाठी,
प्रोत्साहित आता कर तिला.
shubham s supane
7350878463