अपेक्षा
मान नव्हे,अपमान नव्हे
माणुसकीचे वरदान हवे
मंदिर नव्हे,दरबार नव्हे
छोटेसे घरदार हवे
पूजा नको, जयकार नको
सोन्याचा संसार हवा
निज नात्यांचा दंश नको
मानवतेचा वंश हवा
गाडी नको, बंगला नको
नको समतावाद नवा
जगण्या मरण्या जीवन लढण्या
दिलाचा दिलदार हवा
स्त्री नको पुरूष नको
अद्वैताचा ध्यास हवा
अर्धनारी नटेश्वर रूपे
शंकराचा अवतार हवा
मिळून साथ आयुष्याची
घडवू या अध्याय नवा
संसाराची वाट चालण्या
फक्त तुझा हात हवा
- अरूण सु.पाटील
(08.03.2017)
आंतरराष्ट्रीय महिला दिन
https://www.facebook.com/AsuChyaKavita