होती एक ठिणगी मनात कुठेतरी
जन्म घेत होती कवीच्या अंतरी
कळले ना कधी शब्द एकवटलेले
भावनांचे ढग कवीच्या मनी दाटलेले
आयुष्याच्या व्यथा कागदी उतरताना
कळा सोसूनि जन्म कवितेचा होताना
कवी माय होतो अन् लेक होते कविता
भावनांच्या प्रवाहात वाहते शब्दसरिता
जीव लावी कवी लेखणीला गिरवताना
होई गर्व त्यास कवितेला मिरवताना
सुख वाटे जीवा कविता जिवंत जगताना
दाटूनि येई उर जगी सुपूर्द करताना
- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11
(http://72.78.249.110/SM3/(S(25g4cyu4q5mmyp552u3jo2mb))/DCFFB828070006F8770054CDDD7B0363B79BE560D17464AD6CBBF50649CE6D2BF77A853B2AF5FC10.file)
*_कवी माय होतो अण् लेक होते कविता_*
क्या बात हैं....! वाह. ..... अप्रतिम. .!