ऊभं पिकं....
---------------
लाल-काळ्या या मातीमंधी.
हीरवाई पिकानं पांघरली.
मंद वाऱ्याच्या अशा झुळंकेनं,
ऊभं पिकं डाेळतं राहीली...
ऊभं पिकं डाेळतं राहीली...
चिवंचिवं आवाजं करीतं,
पिकांवर भल्या पहारी.
जमली माेठी पक्ष्यांची गर्दी.
चाेचीमंधी दानं टिपुनीयां,
ती भुरंकनं आकाशी उडाली...
हीरव्यागारं शेतामंधी,
शेतकरी राजा ऊभा राही.
मायेच्या या आपुल्या नजरेनं,
ऊभ्या पिकाकडं ताे पाही...
दिसं-रातं आपुल्या शेतामंधी,
शेतकरी राजा लयीं कष्ट करी.
जणु आपल्या लेकरांप्रमाणं,
ताे पिकाची काळजी करी...
कीती ही शेतकऱ्याच्या,
जिव्हाळ्याची नाती.
हिरवंगारं पीकं अनं काळी धरणी माती...
हिरवंगारं पीकं अनं काळी धरणी माती...
-ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
(९०७५८३८३५४)
(ता.-मुरबाड,जि.-ठाणे.)