पंख पसरवुनी निघाली
नाही प्रांत नाही कुठली सीमा,करत जगी परिक्रमा
कोठली नवलाई,घेवून अनुभव नभ-नभांचे
होवुनी एकसंघ करूनी थवे,शोधण्या काय ते नवे
गवसणी अथांग सागरी,घेवूनी झेप अंबरी
पंख पसरवुनी निघाली
शोधण्या एक नवीन निवारा
दाणे चोचीत वेचुनी,रानोरानी नाचुणी
चिव चिव ऐकवूनी,गेली प्रवासी परतुनी
काडी काडी जोडुनी,घर रिकामे ठेवुनी
उंचावुनी आकाशी,अंग अंग फडफडवूनी
पंख पसरवुनी निघाली
शोधण्या एक नवीन निवारा
पिल्लांना घेवूनी,चांदणे शिंपुणी
ठेवुनी आठवणी,गात नवी गाणी
डोहात न्हाहुनी,फळफळे खावुनी
जीव लावूनी,जीव तळमळवुनी
पंख पसरवुनी निघाली
शोधण्या एक नवीन निवारा