नाते शब्दांशी
दुःख ऐकायला नसते कोणी
तेव्हा वाढतो मनावरचा भार
कागदांवर उतरता शब्द हळूच
तेव्हा होते मन हलके फार
मी फारच नशीबवान आहे
नाते जोडले माझ्याशी शब्दांनी
कितीही असले दुःख जरी
गीळून घेतले अश्रू पापण्यांनी
शब्द खिळवू ठेवतात मला
लागताच कधी चाहूल दुःखाची
शपथ आहे शब्दा तूला
नको सोडू साथ कवितेची
भावना उतरते कवितेच्या रूपात
वाट मिळते नवीन वळणाची
अशा जगात वावरतो जिथे
माणसं आहेत दगड मनाची
यल्लप्पा सटवाजी कोकणे
११ एप्रिल २०१७
९८९२५६७२६४