तु भेटून
गेल्यावर सखे
ह्रदयात माझ्या
वेगळेच तरंग जन्म घेतात...
नव नवीन भावना
ह्रदयाला माझ्या
स्पर्श करतात
आणी ह्रदयाला
माझ्या मोहून टाकतात...
नजरे आड झाल्यावर तु
तुझा चेहरा
असा काही नजरे
समोर असतो माझ्या
मग स्वप्नांना ही
जागा नसती माझ्या..
स्वप्नातही तूचं
आणी ह्रदयातही तूचं
प्रत्येक क्षणी
असतीस
तु आस पास माझ्या...
♥....राहुल घोरपडे....♥